अंजीरचं सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर आरोग्याचं खजिना असण्यासोबतच त्याचे अनेक फायदे देखील आहे. अंजीरमध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि फायबरसारखे पोषकतत्व आहेत. अंजीरमध्ये इतर फळांच्या तुलनेत कॅलशियम जास्त प्रमाणात आढळते. अंजीरच्या सेवनाने कॅलशियमची कमी दूर होऊन हाडं मजबूत होण्यास मदत होते. अंजीर खाल्याने चेहरा हायड्रेटेड राहतो आणि चमकदारही होतो. अंजीरने रक्तदाब नियंत्रणात राहतो. अंजीरच्या सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. डायबेटिस रुग्णांसाठी अंजीर फायदेशीर ठरते.