नाश्ता

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना ब्रेकफास्ट म्हणजेच न्याहारी हे दिवसातील सर्वात महत्वाचं जेवण आहे.

'या' चुका टाळा

तुम्ही या ब्रेकफास्ट करताना काही चुका करणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा तुमचं वजन कमी करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जाऊ शकतात.

रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा पिणे

रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहाचे सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो, म्हणून रिकाम्या पोटी कॉफी पिण्याऐवजी, एवोकॅडो टोस्ट किंवा ओट्स यांसारख्या प्रथिने आणि हेल्दी फॅट असलेला नाश्ता करा.

गोड नाश्ता

पेस्ट्री आणि फ्लेवर्ड दही किंवा शर्करायुक्त पदार्थ स्नॅक्स म्हणून चवदार असू शकतात पण तुमचे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना व्यर्थ ठरवू शकतात.

प्रथिने वगळणे

न्याहारीमध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर आणि वारंवार भूक लागत नाही.

पुरेसे फायबर न खाणे

नाश्त्यात फायबरच्या कमतरतेमुळे भूक वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अधिक वेळ भूक लागून खाण्याची वेळ येऊ शकते.

फक्त ज्यूस पिणे

ब्रेकफास्टसाठी फक्त ज्यूस किंवा कॉफी पिण्याऐवजी, लोकांनी फळांचे स्मूदी बनवा, ज्यामध्ये फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश असेल.

जास्त खाणे

ब्रेकफास्ट पोटभर करायला हवा, पण ओव्हरलोड न्याहारीमुळे तुम्हाला सुस्त वाटू शकते आणि अनावश्यक कॅलरी वाढू शकतात.

न्याहारी उशिरा खाणे किंवा नाश्ता न करणे
हे वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. उशिराने जेवण करणे किंवा नाश्ता न करणे यामुळे चयापचय क्रिया मंदावते.


हेल्दी ब्रेकफास्ट

दिवसाची चांगली आणि सकारात्मक सुरुवात करण्यासाठी निरोगी नाश्ता सर्वोत्तम आहे. झोपेतून उठल्यानंतर तासाभरात नाश्ता करण्याचं ध्येय ठेवा.

वेळ कमी असल्यास 'हे' करा

तुमच्याकडे वेळ कमी असल्यास, ओट्स सारख्या पर्यायांसह आदल्या रात्री नाश्ता तयार करुन ठेवा.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.