हिवाळ्याच्या मोसमात आपल्याला अनेकदा खोकला, संसर्ग आणि इतर अनेक आजारांना बळी पडावे लागते.

पण आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करुन हे टाळता येईल.

हिवाळ्यात मनुका खाणे फायदेशीर ठरू शकते, ते कसं ते सविस्तर वाचा.

मनुका हे कोरड्या द्राक्षांचा एक प्रकार आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

हिवाळ्यात मनुका खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते. यांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे लगेच ऊर्जा मिळते.

मनुकामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात, जे आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात.

बेदाणे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.

पचनसंस्थेसाठीही मनुका खूप फायदेशीर आहे. याशिवाय मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठतासारख्या समस्याही दूर राहतात.

मनुका हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. याचे सेवन केल्याने ॲनिमियासारख्या समस्या टाळता येतात.

यामध्ये रिबोफ्लेविन आणि थायामिन, यासारखे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात,

जे शरीरात ऊर्जा निर्माण करुन आणि चयापचय वाढविण्यात मदत करतात.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.