काहीवेळा कमी झोप घेणे सामान्य आहे परंतु जर तुम्ही दररोज कमी झोप घेतली तर आजारांचा धोका वाढू शकतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexel

हृदयविकाराचा धोका

कमी झोपेमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे संतुलन बिघडते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Image Source: pexel

स्मरणशक्ती कमी होणे

दररोज कमी झोप घेतल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते

Image Source: pexel

कमकुवत प्रतिकारशक्ती

कमी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexel

मानसिक समस्या असणे

झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि तणावासारखे मानसिक आजार होऊ शकतात. त्यामुळे ७-८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Image Source: pexel

वजन वाढण्याची समस्या

कमी झोपेमुळे शरीरात घ्रेलिन हार्मोन वाढतो ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

Image Source: pexel

मधुमेहाचा धोका

दररोज कमी झोप घेतल्याने शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexel

यासाठी शरीरासाठी दररोज 8 तासांची झोप आवश्यक आहे, ज्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते.

Image Source: pexel

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: abp network