एसीडीटी

आजच्या या काळात एसीडीटीची समस्या सामान्य आहे. मसालेदार पदार्थ आणि जंक फुड सारख्या पदार्थामुळे एसीडीटी होणे हे मुख्य कारण बनले आहे.

लक्षणे

एसीडीटी मुळे छातीत आणि पोटात जळजळ होते, काही वेळा खुप त्रास झाल्याने डॉक्टर कडे सुध्दा जावं लागत.

या गोष्टी आहारात घ्या

जर तुम्हाला सुध्दा एसीडीटीचा भयंकर त्रास होत असेल तर काही शरीरीसाठी उपयुक्त गोष्टी तुमच्या आहारात जरूर समाविष्ट करा, यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

थंड दूध

दुधामध्ये खुप प्रमाणात कॅल्शिअम असते, जे पोटाला थंड ठेवण्याचे काम करते. जर एसीडीटी पासून वाचण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

केळ

केळ हे परिणाम थंड मानले जाते. केळ खाल्याने एसीडीटी पासून आराम मिळतो, केळ्यामध्ये असलेले फायबर हे पोटातील एसिडचे प्रमाणाला स्थिर ठेवते.

पुदिना

पुदिना मुळातच थंड असते, आणि एसीडीटी पासून जलद आराम देण्यास मदत करते. यामुळे पुदिना चावून खा किंवा त्याचा सरबत करूण प्या.

सौफ

सौफमध्ये अँटी अल्सर गुणधर्म असतात. जे पोटाला थंड ठेवते आणि एसीडीटीचा त्रास होण्यापासून बचाव करते. जेवण केल्यानंतर सौफ खाणे खुप फायदेमंद राहील.

लवंग

लवंग हे किचनमध्ये वापरणारा असा मसाला आहे तो पोटातील जळण झाल्यास लवंग एसिडला स्थिर ठेवते. यामुळे एसीडीटी पासून मुक्त राहण्यासाठी लवंग हे खुप फायदेशीर राहते.

इलायची

हिरवी इलायची पण एसीढीटीच्या त्रासापासून मुक्त ठेवण्यास मदत करते. इलायची ही जेवण पचन करण्यास आणि स्वस्थ ठेवण्यास मदत करते. तर जेवल्या नंतर खाणे उपयुक्त राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.