पण, त्याहीपेक्षा मनुक्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
तर, मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं.
मनुक्याचं पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत...
पण, त्याहीपेक्षा त्याचे चेहऱ्याच्या त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी उपयोग होतो.
मनुक्याच्या पाण्यातले अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्वचा मुलायम करण्यास फायदेशीर ठरतात.
10 ते 12 मनुके घ्या आणि रात्री कोमट पाण्यात भिजत ठेवा, त्यानंतर सकाळी अनोशापोटी हे पाणी गाळून प्या.
हे पाणी गाळून टोनर म्हणूनही वापरु शकता.
या पाण्यापासून तुम्ही फेसपॅकही वापरु शकता, या पाण्यात बेसन आणि हळद घाला...
तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका, तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल...
सकाळी उठल्यावर अनोशापोटी याचं सेवन केल्यानं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते...
मनुक्याच्या पाण्यातील अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतील.
(वरील बाबी केवळ माहिती म्हणून पुरवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)