पाय मुरगळलाय? मग 'हा' उपाय करा, काही मिनिटांत धावत सुटाल...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

अनेकदा खेळताना, धावताना किंवा अगदी चालतानाही पाय मुरगळतो...

Image Source: pexels

पाय मुरगळल्यामुळे सूज आणि दुखणं सुरू होतं...

Image Source: pexels

यामुळे चालणं, फिरणं कठीण होतं आणि पाय हलवतानाही एवढ्या वेदना होतात की, अगदी नकोसं होतं...

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, जर मुरगळलेला पाय लवकर बरा करायचा असेल, तर एक उपाय सांगतो, नक्की ट्राय करा.

Image Source: pexels

पाय मुरगळल्यास सर्वात आधी बर्फानं शेक द्या. यामुळे सूज कमी होईल आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

Image Source: pexels

त्यानंतर, कापडाच्या बँडेजचा वापर करून पायाला पट्टी बांधा. यामुळे पायाची सूज कमी होईल आणि जखमेवर ताण येणार नाही.

Image Source: pexels

जिथे पाय मुरगळलाय, त्या ठिकाणी हळद आणि तुरटीचा लेप घाला. त्यामुळे वेदान कमी होतील आणि सूजही येणार नाही.

Image Source: pixabay

गरम पाण्यात जाडं मीठ (खडा मीठ) टाकून शेक दिल्यास स्नायूंना आराम मिळतो.

Image Source: pixabay

पाय मुरगळल्यास घरगुती उपाय कराच, पण त्यासोबतच डॉक्टरांचाही सल्ला घ्या.

Image Source: pexels