कडक चहा बनवण्याचा प्रभावी मार्ग

चहा हे भारतीयांचं आवडते पेय आहे. अनेक जण सकाळी चहाने दिवसाची सुरुवात करतात. अशा काही गोष्टी आहेत, ज्याद्वारे तुम्ही त्याची चव वाढवून कडक चहा बनवू शकता.

Published by: स्नेहल पावनाक

गूळ

गुळाचा चहा हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो आणि पचनक्रिया सुधारतो.

Published by: स्नेहल पावनाक

आले

आले हे चहाची चव तर वाढवते, यासोबतच त्यात आढळणारे जिंजरॉल घशातील खवखव आणि दुखण्यापासून आराम देते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Published by: स्नेहल पावनाक

वेलची

वेलची ठेचून टाकल्यास चहाची चव वाढते, इतकंच नाही तर त्याची आम्लीय पातळी कमी करते.

Published by: स्नेहल पावनाक

दालचिनी

दालचिनीची एक छोटी काठी चहामध्ये टाकल्यास त्याची चव वाढते. दालचिनीमुळे चहातील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल वाढवण्यास मदत होते. हा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Published by: स्नेहल पावनाक

तुळशीची पाने

चहामध्ये तुळशीची पाने मिसळून प्यायल्याने तणाव कमी होतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Published by: स्नेहल पावनाक

हळद

हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि कर्क्यूमिन असते, ते सांध्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Published by: स्नेहल पावनाक

बडीशेप

बडीशेप पचन आणि जळजळच्या समस्या कमी करण्यास मदत करते.

Published by: स्नेहल पावनाक

लवंग

लवंगमध्ये युजेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के आणि सी असतात, जे खोकल्यापासून आराम देण्यासोबतच घशाला आराम देतात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.

Published by: स्नेहल पावनाक

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक