बदलत्या व्यस्त जीवनशैली वाढत वजन ही अनेकांची समस्या बनली आहे. अनेकांसाठी वजन कमी करणं फार अवघड ठरतं.
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळे उपाय करतात. आम्ही आज तु्म्हाला घरगुती फॅट बर्नर ड्रिंक बद्दल सांगणार आहे.
या फॅट बर्नर ड्रिंकने तुमचं वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.
हे ड्रिंक बनवण्यासाठी लिंबूचे 4 भाग करा आणि पाण्यात टाका.
आता या पाण्यात आल्याचा छोटा तुकडा, चार-पाच काळी मिरी आणि चिमूटभर दालचिनी घालून हे पाणी चांगलं उकळा.
यानंतर हे ड्रिंक गाळून घ्या आणि दररोज रिकाम्या पोटी सेवन करा. हे ड्रिंक तुम्ही तुमच्या वर्कआउटच्या आधी देखील पिऊ शकता.
हे ड्रिंक दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा पिऊ नका. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि रात्री झोपतेवेळी पिणे उत्तम राहील.