आवळा सूपरफूड मानले जाते. आवळ्याचे अनेक फायदे आहेत.

Image Source: istock

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळतात.

Image Source: istock

आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात.

Image Source: istock

आवळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते.

Image Source: istock

आवळ्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Image Source: istock

आवळा चहामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Image Source: istock

आवळा चहा कसा बनवायचा?

एका पातेल्यात दोन कप पाणी घेऊन ते उकळा. त्यामध्ये आले, तुळशीची पाने आणि आवळा टाका. आवळा नसल्यास तुम्ही आवळा पावडर वापरु शकता.

Image Source: istock

आता हे मिश्रण मंद आचेवर उकळा. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि हा चहा गाळून कपमध्ये गरमागरम सर्व्ह करा.

Image Source: istock

चवीसाठी तुम्ही यामध्ये थोडे मध आणि काळी मिरी घालू शकता.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock