अलिकडे बहुतेक जण अंघोळ करताना स्क्रब वापरतात. बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब उपलब्ध आहेत.

Image Source: istock

बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब उपलब्ध असले, तरी त्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण जास्त असतं.

Image Source: istock

अशावेळी तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करु शकता. होममेड स्क्रब तयार कसा करायचा, ते जाणून घ्या.

Image Source: istock

कॉफी आणि हनी स्क्रब

कॉफी पावडर, मध आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 5-7 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Image Source: istock

बेसन, दही आणि खोबरेल तेल

हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 5-7 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Image Source: istock

मीठ आणि खोबरेल तेल

मीठ आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा, नंतर कोमट पाण्याने धुवा.

Image Source: istock

ओटमील, मध आणि खोबरेल तेल

ओटमील, मध आणि खोबरेल तेल एकत्र करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 5-7 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवून टाका.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock