याचे कारण म्हणजे रक्तप्रवाहातील अडथळा आणि मज्जातंतूंच्या कार्यात बाधा.
ही समस्या दीर्घकाळ टिकल्यास गंभीर ठरु शकते.
त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी पुढील उपाय करुन पाहा.
मोहरीचे तेल, तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल गरम करून हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सुन्नपणा कमी होतो.
कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रोज प्या. यामुळे हाडे मजबूत होतात आणि नसांवरील दाब कमी होतो.
रोज सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम करा. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
हिरव्या पालेभाज्या, बदाम आणि अक्रोड खा. मॅग्नेशियममुळे नसांचे कार्य सुधारते आणि सुन्नपणा कमी होतो.
प्रभावित भागावर गरम पाण्याने 20-30 मिनिटे शेक द्या. यामुळे नसांवरील दाब कमी होतो आणि वेदना दूर होतात.
हे उपाय नियमित केल्याने सुन्नपणा आणि वेदना कमी होऊन शरीर सुदृढ राहील.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.