स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण जास्त असते.
किडनी स्टोनच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता.
मिठाचे जास्त सेवन केल्याने आणि पाणी कमी प्यायल्याने मूतखडा होण्याची शक्यता असते.
जास्त पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. पाण्यामुळे लहान किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते
डाळिंबाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनचे व्यवस्थापन होण्यास मदत होऊ शकते.
रोज गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन केल्यास किडनी स्टोन कमी होण्याची शक्यता असते.
नारळाचे पाणी शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेटेड ठेवते, यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे किडनी स्टोनला लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करतात.
तुळशीमध्ये ऍसिटिक ऍसिड असते जे किडनी स्टोन निघून जाण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
1-2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्याने वेदना कमी होतात आणि स्टोन प्रतिबंध करण्यास मदत होते.
किडनी स्टोन असल्यास मीठ, मांस, चॉकलेट, बीट, काजू, चहा, पालक, गोड पदार्थ खाऊ नयेत यामुळे किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असते.