दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
दुधामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए यासारखी पोषक तत्वे आढळतात.
दूध प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मसालेदार जेवणानंतर एक ग्लास दूध प्यायल्याने छातीतील जळजळ कमी होते.
दूध हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे, यामुळे तुमची हाडे आणि दातांचे आरोग्य सुधारते.
तूमच्या आहारात कमी चरबीयुक्त किंवा चरबीमुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाइप 2 मधुमेह कमी होऊ शकतो.
दुधामध्ये व्हिटॅमिन ए आणि प्रथिने असतात ज्यामुळे तूमच्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
व्हिटॅमिन डी, सी आणि बी जीवनसत्त्वे समृध्द अन्न, जसे की दूध तुमची पचनसंस्था चांगली ठेवण्यास मदत करते.
नियमितपणे दूध प्यायल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते.
दूध कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले आहे, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.