एअर कंडिशनिंग आधुनिक जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे.
एअर कंडिशनिंगमुळे वाढत्या तापमानापासून आराम मिळतो.
मात्र एअर कंडिशनिंगच्या दीर्घकाळ वापराने आरोग्यासामबंधीत अनेक समस्या उद्भवतात.
एअर कंडिशनिंगचा सर्वात मोठा दुष्परिणाम डोळ्यांना होतो. एअर कंडिशनिंग खोलीतील आर्द्रता कमी करते ज्यामुळे डोळे कोरडे होतात.
एअर कंडिशनिंग हवेतील आर्द्रता कमी करते ज्यामुळे शरीराच्या हायड्रेशन स्तरावर परिणाम होतो आणि त्वचा कोरडी होऊ शकते.
एअर कंडिशनिंगमुळे काही लोकांना डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. थंड, कोरड्या हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मायग्रेन चा धोका वाढतो.
हवेमध्ये आर्द्रता नसल्यावर आपली त्वचा ओलावा गमावू शकते आणि त्वचा कोरडी होऊ शकते यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणे आणि मॉइश्चरायझर्स वापरणे फायदेशीर ठरते.
एअर कंडिशनिंगचा आपल्या श्वसन प्रणालीवर हानिकारक परिणाम होतो. थंड हवेमुळे खोकला, शिंका येणे आणि घसा दुखणे या समस्या निर्माण होतात.
एअर कंडिशनिंगची योग्यरित्या देखभाल आणि साफ न केल्यावर संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)