फोनकडे जास्त पाहिल्याने एकाग्रतेवर परिणाम होतो. रात्री फोन जास्त पाहिल्याने मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे रात्री फोन वापरणे टाळा.
खराब कोलेस्टेरॉल वाढवणारे प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त अन्न आणि जंक फूड मेंदूचे कार्य बिघडवू शकतात.
धूम्रपान आणि मद्यपान हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे, यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि मेंदूच्या पेशींचे नुकसान होते.
तणाव आणि चिंता कॉर्टिसोलची पातळी वाढवते आणि मेंदूचे आरोग्य खराब करते. जर तुम्हाला तणावाची समस्या असेल तर, ध्यान आणि योगाद्वारे तुम्ही तणाव दूर ठेऊ शकता.
एकटेपणा जाणवल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. एकटेपणा मेंदू सुन्न करतो.
मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी नेहमी शारीरिक हालचाली कराव्यात. जे लोक तासन्तास बसून काम करतात त्यांनी रोज व्यायाम करायला हवा. अन्यथा मेंदूचे कार्य मंदावते.
रोजच्या व्यायामाने मेंदू निरोगी राहतो आणि एकाग्रता सुधारते.