कमी पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात.
शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.
पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या देखील उद्भवतात.
दीर्घकाळापर्यंत डिहायड्रेशनमुळे किडनी स्टोन, यूटीआय आणि किडनी खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
कमी पाणी प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी कमी होते आणि तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
मानसिक आरोग्यावरही कमी पाणी प्यायल्याचा परिणाम दिसून येतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे या समस्या उद्भवू शकतात.
डिहायड्रेशनमुळे तुमची रोगप्रतिकारक कमी होऊ शकते.
प्रत्येकाने दिवसातून 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.