पपई हे एक असे फळ मानले जाते, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.

Image Source: pexel

असं म्हणतात की, पपई नियमित खाल्ल्याने पोटाच्या बहुतेक समस्या दूर होतात.

Image Source: pexel

तसेच, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त मानले जाते.

Image Source: pexel

पपई कच्ची आणि शिजवलेली दोन्ही प्रकारात वापरली जाते.

Image Source: pexel

केळ्यांबद्दल बोलायचे झाले तर, केळ्यामध्येही अनेक पोषक घटक आढळतात.

Image Source: pexel

केळीच्या सेवनाने शरीराला भरपूर पोटॅशियम मिळते. जे स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Image Source: pexel

केळी आणि पपई एकत्र खाऊ शकतो का?

केळी आणि पपई एकत्र खाणे फायदेशीर आहे की नाही, हे तुमच्या पचनसंस्थेवर अवलंबून असते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
अनेकांची पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे केळी आणि पपई एकत्र खाल्ल्यास त्यांच्या समस्या वाढतात.

Image Source: pexel

'या' लोकांनी केळी आणि पपई खाऊ नये :

ज्या व्यक्तींना दमा किंवा श्वसनाचे कोणतेही आजार असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपईचे सेवन करावे.

Image Source: pexel

पपईमध्ये पपन नावाचे तत्व असते, ज्यामुळे काही लोकांना ऍलर्जीची तक्रार असते. जर अशा व्यक्तींनी पपई खाल्ली तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Image Source: pexel

याशिवाय गर्भवती महिलांना पपईचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. पपई आणि केळीचे मिश्रण देखील गर्भवती महिलांसाठी योग्य नाही.

Image Source: pexel

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexel