चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत.

Image Source: Pexel

काहीजण याचा भरमसाठ वापर करतात तर काहीजण ब्यूटी ट्रिटमेंट घेत असतात.तसेच, चमकदार त्वचेसाठी आज बाजारात अनेक सुंदर सुगंधी साबण उपलब्ध आहेत, जे आपण आंघोळीसाठी वापरतो.

Image Source: Pexel

1. बेसनाचे स्क्रब

बेसणामध्ये मोहरीचं किंवा बदाम तेल, गुलाब पाणी आणि चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा.

Image Source: Pexel

ही पेस्ट त्वचेवर स्क्रबप्रमाणे वापरा. त्यानंतर 15 मिनिटांसाठी तशीच राहू द्या.
या नंतर तुन्हा स्क्रब स्वच्छ पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवर टॅनिंग दूर होईल.

Image Source: Pexel

2. कॉफी स्क्रब

एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि नारळाचं तेल मिसळून स्क्रब तयार करा.
आता हे त्वचेवर स्क्रब टॅनिंग झालेल्या ठिकाणी लावा. स्क्रब केल्यानंतर 10 मिनिटे त्वचेवर तसंच राहू दे.

Image Source: Pexel

त्यानंतर स्क्रब थंड पाण्याने धुवा. हे स्क्रब तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करेल.

Image Source: Pexel

3. बडीशेपचं स्क्रब

बडीशेप घेऊन ती मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण एका बरणीत भरून ठेवा. एक चम्मच वाटलेली बडीशेप घ्या. यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळा.

Image Source: Pexel

याची पेस्ट तयार करुन घ्या. हे स्क्रब चेहऱ्यावर किंवा टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Image Source: Pexel

या स्क्रबने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर होईल. तुमची त्वचा सुंदर, चमकदार आणि मुलायम होईल.

Image Source: Pexel

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pexel