दुधाचा चहा सर्वांनाच आवडतो मात्र याचे दुष्परिणामही बरेच आहेत.



चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे फुगण्याची समस्या उद्भवू शकते व गॅस निर्मिती होते.



चहामध्ये थिओफिलिन असते ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो.



दुधाच्या चहामध्ये शरीराला आवश्यक पोषक तत्त्वाची कमी असते यामुळे लोह आणि झिंकची कमतरता निर्माण होते.



रात्रीचा चहा प्यायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.



दुधाच्या चहामध्ये फुल फॅट दूध आणि साखर असल्याने वजन वाढते.



रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.



दुधाचा चहा प्यायल्याने आम्लपित्त, उलट्या, मळमळ, भूक न लागणे,डोकेदुखी या समस्याही निर्माण होऊ शकतात.



जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.



(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत् आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )