पोहे हे कार्बोहायड्रेटने परिपूर्ण असतात. ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरवात ऊर्जादायी होईल.
पोह्यात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पोहे नैसर्गिकपणे ग्लुटेन मुक्त असतात. त्यामुळे हा सेलिआकसारख्या आजाराच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
पोहे पचायला सोपे असल्याने हलका नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे.
पोह्यांमध्ये आयर्न असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं आणि अशक्तपणा दूर करते.
पोह्यांमध्ये फायबर असतं, ज्याने पचन करण्यास मदत होते.
पोह्यात B1 ,B2 ,B3 ,B6 सारख्या जीवनसत्व ,आयर्न ,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिज घटकांचा समावेश असतो.
पोह्यात फॅटचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हे हृदयासाठी उत्तम पर्याय आहे
पोहे अनेक प्रकारे बनवू शकतो, जसं विविध भाज्या आणि अनेक मसाल्यांचा समावेश करून बनवू शकतो.
पोहे हा कमी वेळेत तयार होणारा नाश्ता आहे.