काळीमिरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुमच्या केसांकरिता अतिशय उपयुक्त आहे.
काळ्यामिरीमध्ये पाइपरिन नावाचा घटक असतो, हा घटक रक्तप्रवाह वाढवून केसांच्या वाढीला मदत करतो.
काळ्यामिरीमध्ये अँटीफंगल आणि बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कोंडा कमी करण्यास उपयुक्त ठरतात. ज्यामुळे कोड्यांसह खाजेपासूनही सुटका होते.
काळीमिरीमुळे केस मुलायम होतात. तसेच यामुळे केस दाट आणि चमकदार होऊन यामुळे त्यांची रचना सुधारण्यास मदत होते.
काळीमिरीमधील पाइपरीन केसांची मूळे मजबूत करते आणि केस गळती रोखून त्यांच्या वाढीस मदत करते.
काळीमिरीमधील पाइपरिन हे केसांच्या रंगासाठी उपयुक्त असते. हे केसामधील मेलेनिनचे उत्पादन वाढण्यास मदत करते. ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.