आयुर्वेदानुसार, कोकम पित्तनाशक आहे.
कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्याला आमसूल म्हणतात.
तसेच, कोकमात साखर भरुन त्यापासून कोकम सरबत तयार केलं जातं.
कोकमाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत,
कोकम खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
कोकमात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. कोकमाचं सेवन केल्यानं हृदयाचं आरोग्य उत्तम राहातं.
कोकमात अॅन्टी डायरिया गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी कोकम फायदेशीर ठरतं.
कोकममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी आहारात कोकमाचा समावेश करा, झटपट स्लिम-ट्रिम होण्यास मदत मिळते.
कोकम शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे शरीर अनेक समस्यांपासून दूर राहातं.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.