कोरोनाने देशातच नाही तर जगभरात हाहाकार माजवला होता आणि अनेकांचे बळी घेतले.
अजूनही या महामारी आणि त्याकाळातील भीषण परिस्थिती लोक विसरलेले नाहीत, दरम्यान कोरोनापेक्षाही धोकादायक महामारीचा प्रकोप होऊ शकतो.
पुढील अडीच दशकांत आणखी एक भयंकर महामारी चिंता वाढवू शकते, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
कोरोनापेक्षाही भयंकर महामारीमुळे जगातील कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो.
AMR आणि 22 जीवाणू या महामारीचं कारण बनतील. एएमयूच्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
या अभ्यासात 200 देशांच्या मागील 31 वर्षांच्या (1990-2021) डेटाचे विश्लेषण करण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही भविष्यातील धोकादायक परिस्थितीबाबत इशारा दिला आहे.
एएमयूचे प्रोफेसर असद उल्लाह खान यांनी सांगितलं की, 2050 पर्यंत मूक महामारीचा प्रकोप शिखरावर पोहोचेल, ज्यामध्ये चार कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
या महामारीत शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या माध्यमातूनच मृत्यूदर कमी करता येऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.