शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
शेंगांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
शेवग्याच्या शेंगांचं सेवन केल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
शेंगांमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेली पोषणतत्त्व त्वचेला उजळवण्यासाठी, केसांना मजबूत ठेवतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यानं हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.