कोरोना काळानंतर मुलांचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

या शिक्षणाचा मुलांना फायदा झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम देखील आता दिसू लागले आहेत.

Image Source: unsplash

मोबाईलमध्ये गुंतून राहण्याची सवय जडल्याने यामुळे अनेक मुलांना दृष्टीदोष निर्माण झाल्याचं नेत्र तज्ञांच्या निदर्शास आले आहे.

Image Source: unsplash

कोरोना काळात शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सुरु केले होते.

Image Source: unsplash

यामध्ये चांगलं यश देखील मिळालं तसेच या निर्णयामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडला नाही.

Image Source: unsplash

ही सकारात्मक बाजू जरी असली तरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे काही दुष्परिणाम देखील दिसू लागले आहेत.

Image Source: unsplash

ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुले सातत्याने मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाला आहे.

Image Source: unsplash

तसेच यामुळे मुलांच्या दृष्टीदोषात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, अनेक मुलांना जवळचे तर काहींना दूरचे दिसण्यास अडचण येत आहे.

Image Source: unsplash

तर काहींच्या डोळ्यांतून पाणी येणे, जळजळ होणे अशा प्रकारच्या विकारात वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash