सकाळी लिंबू पाणी प्यायल्यावर शरीरातील मेटाबॉलिजम वाढतो, चरबी घटण्यास मदत होते.
ग्रीन टी प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
आल्यामध्ये असलेले जिंजरॉल हे ॲसिड रिफ्लक्स, अपचन किंवा पोटाच्या समस्यांमध्ये मदत करते, यामुळे पोट कमी होते.
काकडीचं पाणी हे डिटॉक्स वॉटर हे अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असते आणि पचनास मदत करते. हे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्याने फॅट लॉसला मदत होते. याचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी होते.
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम ही खनिजे आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 1 च्या उच्च स्रोत असल्यामुळे हे एक सुपरफूड मानले जाते. याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.
ओवा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओव्याचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि अनेक गंभीर समस्यांपासून बचाव होतो.