पदार्थांचे पचन हा एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा प्रक्रिया आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

पचन शरीराचे आरोग्य, वय, लिंग, मेटॅबॉलिझम आणि खाल्लेल्या अन्नाचं प्रमाण यावर अवलंबून असते.

Image Source: pinterest

सामान्यतः अन्न पचून त्यातील पोषकतत्त्वे शरीराद्वारे शोषित होण्यासाठी 24 ते 72 तास लागतात.

Image Source: pinterest

वेगवेगळ्या पदार्थांना पचायला लागणारा वेळ जाणून घेऊ.

Image Source: pinterest

द्रव पदार्थ

ज्यूस, चहा, कॉफी, सोडा यासारखे द्रव पदार्थांचे पचन होण्यास 30 ते 45 मिनिटे लागतात.

Image Source: pinterest

प्रोटीन शेक

घट्ट द्रव पदार्थांना पचायला 50 ते 60 मिनिटे लागतात.

Image Source: pinterest

मासे आणि अंडी

अंडे पचायला 40 मिनिटे, तर मासे पचायला 35 ते 60 मिनिटे लागतात.

Image Source: pinterest

भारतीय पारंपरिक अन्न

पोळी, भाजी, भात आणि डाळसारखे पदार्थ पचायला दीड ते तीन तास लागतात, कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.

Image Source: pinterest

डेअरी प्रोडक्ट्स

फॅट व प्रोटीन असलेल्या डेअरी प्रोडक्ट्स दूध, पनीर, लोणी यासारख्या पदार्थांचे पचन होण्यासाठी 2.5 ते 4 तास लागू शकतात.

Image Source: pinterest

ड्रायफ्रुट्स

बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे पचन होण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात.

Image Source: pinterest

चिकन आणि इतर मांसाहार

चिकन आणि मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त असल्याने यांचे पचन होण्यासाठी 15 ते 24 तास लागू शकतात.

Image Source: pinterest

पाणी

पाणी पचायला फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. पण, जेवल्यानंतर पाणी प्यायल्यास पचन होण्यास 2 ते 2.5 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.

Image Source: pinterest

पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन व आरोग्यदायी आहार पचनक्रिया सुलभ करण्यात मदत करतो.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही

Image Source: pinterest