या फळामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयरनसारखे अनेक पोषक घटक असतात.
यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात.
शरीरात अनेक आजारांचे कारण ठरु शकणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी दोन हात करायला अँटीऑक्सिडंट्स मदत करतात.
हे कमी कॅलरी असलेले फळ वजन कमी करण्यास मदत करते.
यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही.
ड्रॅगन फ्रूटमधील फायबर पाचनतंत्र निरोगी ठेवते. हे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या तक्रारींवर हे फायदेशीर असते.
या फळात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदयासाठी लाभदायक आहेत.
हे फॅटी ऍसिड्स रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.