लांब, मऊ आणि मजबूत केस असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, पण ती पूर्ण होतेच असं नाही.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

अनेकदा केस कोरडे होतात आणि तुटतात. तुमचेही केस विंचरल्यावर सहत तुटत असतील, तर तुमच्याही केसांचं नुकसान झालं आहे.

Image Source: pinterest

केस कोरडे होऊन फाटे फुटणे आणि केसगळती या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. हे नुकसान भरुन काढण्यासाठी उपाय इथे जाणून घ्या.

Image Source: pinterest

उन्हात जास्त वेळ फिरल्याने केसांचं नुकसान होते, हे केसांना फाटे फुटण्याचं एक कारण आहे. याशिवाय केमिकल आणि केसांवर हिटचा अधिक वापरही याचं कारण असू शकतं.

Image Source: pinterest

केस ट्रिम करा

केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर करण्यासाठी 6 महिन्यातून एकदा किमान एकदा केस ट्रिम करा.

Image Source: pinterest

स्ट्रेटनर आणि ब्लो ड्रायर

स्ट्रेटनर आणि ब्लो ड्रायरचा वापर करणाऱ्यांनी 3-4 महिन्यातून एकदा केस ट्रिम करा.

Image Source: pinterest

जास्त वेळा शाम्पूने केस धुणे केसांसाठी हानिकारक ठरु शकते. असे केल्याने केसांमधून नैसर्गिक तेल निघून जाऊन केस कोरडे होतात आणि मग तुटतात.

Image Source: pinterest

केस धुताना जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याचा वापर करु नका. केस धुण्यासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी वापरणं उत्तम राहील.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest