प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये प्रदूषण वाढत आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

वाढत्या प्रदूषणामुळे न्यूमोनियासारखे गंभीर आजार उद्भवतात.

Image Source: pinterest

न्यूमोनियाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Image Source: pinterest

श्वासोच्छवासाच्या अडचणी

प्रदूषणामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. सलग 3-5 दिवस हा त्रास होत असेल, तर ते न्यूमोनियाचे लक्षण असू शकते.

Image Source: pinterest

घसा खवखवणे

कोरडा खोकला, घसा खवखवणे आणि श्लेष्मा असलेला खोकला न्यूमोनियाचे संकेत देतो. नाक वाहणे देखील या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.

Image Source: pinterest

ताप येणे

जर ताप 100 अंशांपर्यंत असेल आणि इतर लक्षणे जाणवत असतील, तर सावध व्हा. शरीरात थकवा येणे देखील न्यूमोनियाचे लक्षण असू शकते.

Image Source: pinterest

छातीत दुखणे

छातीत दुखणे आणि खोकल्यामुळे होणारी अस्वस्थता ही न्यूमोनियाची महत्त्वाची लक्षणे आहेत.

Image Source: pinterest

घाम येणे

प्रदूषणामुळे संसर्ग झाल्यास थंडी वाजून ताप येतो आणि घाम सुटतो. हे देखील न्यूमोनियाचे लक्षण असते.

Image Source: pinterest

जर ही लक्षणे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नका.

Image Source: pinterest

योग्य वेळी निदान न झाल्यास न्यूमोनियाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest