बटर या डेअरी प्रोडक्टचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
बटरमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, यामुळे काही लोकांना बटर खाणं टाळायला हवं.
बटर म्हणजेच लोणी. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई मुबलक प्रमाणात असते. पण, काही लोकांसाठी बटर नुकसानदायक ठरु शकते.
बटरमध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील फॅट वाढते.
हाट कोलेस्ट्रोल असणाऱ्या लोकांनी बटरपासून दोन नाही, तर चार हात लांब राहावे. याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रोल वाढू शकतं.
हाय बीपीचा त्रास असणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी बटर नुकसानदायक ठरेल. याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बटरमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी बटर खाणे टाळावे.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या नसेल तर तुम्ही दररोज एक चमचा बटर खाऊ शकता.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.