तुम्ही कचरा समजून फेकून देत असलेली गाजराची पाने अत्यंत गुणकारी आहेत.
गाजराच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
गाजराच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.
गाजराच्या पानांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते.
गाजराच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन के हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गाजराच्या पानांमध्ये असलेले फायबर पचन सुधारण्यास आणि आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते.
या कॅल्शियम मुबलक प्रमाणात असून ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
याशिवाय, व्हिटॅमिन ए आणि केराटिन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
गाजराची पाने यकृतामध्ये आढळणारे चरबी आणि पित्त यांचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
गाजराच्या पानांमध्ये असलेले आयर्न शरीरातील अशक्तपणा दूर करते.
टीप : वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.