तुम्ही दिवसाची सुरुवात हेल्दी आणि सकारात्मक केली, तर तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होते. एका चांगल्या हेल्दी ड्रिंकने दिवसाची सुरुवात करा.
चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासोबतच यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील आहे. ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होण्यासोबतच स्किनसाठीही उपयुक्त ठरेल.
चिया सीड्ससोबत केसरचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला दुप्पट फायदे मिळतील.
चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोटासाठी चांगले असते, यासोबत केशर सेवन केल्याने ते तुमच्या पचनसंस्थेसाठी खूप प्रभावी ठरते.
चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढून अँटी एजिंगसाठी मदत करतात.
केशर त्वचेचा पोत सुधारुन चमकदार बनवण्यास मदत करते. हे ड्रिंक रोज सेवन केल्याने तुमच्या त्वचेला अनेक फायदे मिळतील.
केशरमध्ये आढळणारे क्रोसिन हे अँटिऑक्सिडेंट, त्वचेची लवचिकता वाढवते आणि सुरकुत्या कमी करते.
चिया सीड्स आणि केशर भूक कमी करतात, ज्यामुळे तुम्हाला वारंवार खाणे टाळण्यास मदत होते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.
केशर आणि चिया सीड्सचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. म्हणून, याचे सेवन प्रमाणित ठेवा आणि तज्ञाचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.