प्लास्टिकचा तांदूळ, रंग मिसळलेली हळद यांसारख्या अनेक भेसळयुक्त वस्तू बाजारात येतात.
आता बाजारात नकली आलं आलंय.
बरोबर ऐकलंत... बाजारात बनावट आलं विकलं जातंय, पण तुम्ही हे कसं ओळखणार?
अस्सल आल्याला गंध असतो, पण बनावट आल्याला अजिबातच गंध नसतो.
अस्सल आल्यावर मातीचा थर असतो, पण बनावट आलं चकचकीत दिसतं.
बाजारात चकचकीत, चमकदार आलं दिसलं तर, नीट पाहा ते बनावट असण्याची शक्यता आहे.
अस्सल आलं ओळखण्यासाठी तुम्ही ते नखानं सोलून पाहा. त्याचा गंध लगेच जाणवतो, बनावट असेल तर गंध येणार नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.