वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना 'या' 7 चुका कराल, तर पदरी निराशा येईल.

Image Source: istock

वजन कमी करण्याच्या प्रवासात काही चुका टाळा, नाहीतर वजन कमी करण्यात अडथळे येतील आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकणार नाही.

Image Source: istock

कडक डाएट आणि व्यायम करूनही जर तुमचा लठ्ठपणा कमी होत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चूक करत आहात.

Image Source: istock

वजन कमी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? येथे जाणून घ्या

Image Source: istock

कॅलरीजचे प्रमाण योग्य नसणे

फक्त कठोर व्यायाम करून तुम्ही बारीक व्हाल, असं वाटत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. व्यायामासोबतच आहारावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही करत असलेल्या कॅलरीजचे सेवन नेहमी बर्न केलेल्या कॅलरीजपेक्षा कमी असावे, हे लक्षात ठेवा.

Image Source: istock

अल्कोहोल सेवन

अल्कोहोल तुमच्या आरोग्यासाठी घातक असते. यासोबतच अल्कोहोल हळूहळू तुम्हाला कमजोर आणि आळशी बनवते. यामध्ये कॅलरीज भरपूर असतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Image Source: istock

आळशी असणे

जोपर्यंत तुम्ही आळशीपणाने वागाल तोपर्यंत तुमचा लठ्ठपणा कमी करताना अडथळे येतील. डाएट करण्यासोबतच व्यायाम केल्यामुळे कॅलरी जलद बर्न होऊन वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

Image Source: istock

तणाव

एका अभ्यासानुसार, तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढू शकतो, ज्यामुळे तुमची चयापचय मंदावते. यामुळे तुमचे वजन कमी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

Image Source: istock

आहारात प्रथिनांची कमतरता

निरोगी प्रथिनयुक्त आहारामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्हाला अधिक ऊर्जा देण्यासोबत पोट भरलेले राहते आणि खाणं कमी करण्यास मदत करते.

Image Source: istock

झोपेचा अभाव

कमी झोपेमुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल झपाट्याने वाढते. त्यामुळे दिवसातून 6 ते 8 तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: istock

वेट लिफ्टिंग न करणे

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना बरेच लोक वेट लिफ्टिंगवर विश्वास ठेवत नाहीत. विशेषत: पोट आणि मांडीची चरबी कमी करायची असेल, तर वेटलिफ्टिंग करुन शरीराची स्थिती सुधारण्यास मदत होते.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock