पहाटे अनोशेपोटी केळी खाल्याने तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे अशी चूक करु नका. यामागची कारणे जाणून घ्या.
केळी भूक भागवते आणि शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते.
केळी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात, त्यामध्ये भरपूर पोषकतत्वे असतात, पण त्याचा सर्वांच्या शरीरावर सारखाच परिणाम होईल, असं नाही.
केळी योग्यप्रकारे आणि योग्य वेळी खाल्ल्यास त्याचा शरीराला फायदा होतो, अन्यथा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
ॲसिडीटी, गॅस किंवा अपचनाची समस्या असल्याचं केळी खाणे टाळा, यामुळे समस्या वाढू शकते.
केळ्यामध्ये कार्बोहाटड्रेट मुबलक साठा असतो, त्यामुळे पचनाला जड जाऊ शकते. यामुळे उलटी, पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
वजन कमी करण्याच्या विचारात असणाऱ्या लोकांनी केळी खाणं टाळावं. सकाळी केळी खाल्ल्याने कार्बोहाइड्रेट आणि कॅलोरीज वाढून वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचं कारण ठरु शकतं.
केळी दुपारच्या वेळेत खाणं उत्तम मानलं जातं. यावेळेत अनेक जण सुस्तावलेले असतात, अशावेळी केळी खाल्ल्याने ऊर्जा वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.