सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषकतत्व आढळतात. सीताफळात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. डोळ्यासंबंधित समस्या जाणवत असल्याने सीताफळ नक्कीच खावं. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते सीताफळामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांची नजर सुधाण्यासाठी मदत होते. सीताफळात कॅल्शियम असल्याने तुमची हाडांना मजबूत होतात. सीताफळ खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यात असलेले आयर्न शरीरासाठी आवश्यक आहे. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.