अनेक लोकांना वाटते की आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील उष्णता निघून जाते.
तुमचाही असाच विचार असेल तर हे चुकीचं आहे.
आईस्क्रीम खाण्यास थंड असले तरी त्याच्या प्रभाव गरम असतो.
आइस्क्रीममध्ये अधिक प्रमाणात फॅट असल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.
यामुळेच आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अधिक तहान लागते.
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानं अनेक समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात आईस्क्रीममुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.
आईस्क्रीम खाल्ल्यानं घसा खवखवणे किंवा सर्दी होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.