तसा, पेरू आरोग्यासाठी फायदेशीर असतोच, पण भाजलेल्या पेरूचं सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी भाजलेला पेरू फायदेशीर ठरतो.
भाजलेला पेरू खाल्यानं बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत असलेला पेरू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
खोकला, कफ झाला असेल आणि त्यानं हैराण असाल तर, या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी पेरू फायदेशीर ठरतो.
पेरूमध्ये असलेलं पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी पोषक तत्व हृदयाशी संबंधित समस्या दूर करतात.
भाजलेला पेरू खाल्ल्यानं थकवा आणि अशक्तपणा दूर होतो, शरीराला ऊर्जा मिळते.
भाजलेला पेरू वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म वाढवण्याचं काम करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही