कंबर वाढली की मधुमेहही? वाचा काय सांगतं संशोधन

Published by: जयदीप मेढे
Image Source: META

तुमच्या कंबरेत दडलेलं आरोग्याचं गुपित!

कंबर जाड झाली म्हणजे फक्त फॅशनचा मुद्दा नाही – हे तुमचं आरोग्य धोक्यात आहे याचं लक्षण असू शकतं. एका नव्या संशोधनानुसार कंबरेचा आकार आणि मधुमेहाचं नातं स्पष्ट दिसतंय आहे.

Image Source: META

मधुमेह वाढतोय, पण कारणं आपल्याच हातात!

रोजची धावपळ, जंक फूड, आणि व्यायामाचा अभाव – या सवयी मधुमेहाला आमंत्रण देतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं आता अधिक महत्त्वाचं झालंय.

Image Source: META

चीनमध्ये झालेल्या अभ्यासातून मोठा खुलासा!

चीनच्या एका हॉस्पिटलमधील संशोधनात हजारो मधुमेही रुग्णांचा अभ्यास केला गेला. यामधून कंबर आणि मधुमेह यांचा थेट संबंध समोर आला.

Image Source: META

मधुमेह + मोठी कंबर = धोका?

अभ्यासानुसार मोठ्या कंबरेच्या महिलांमध्ये मृत्यू दर थोडा कमी होता, पण आरोग्याच्या इतर बाबतीत धोका वाढतोच. त्यामुळे योग्य प्रमाण राखणं महत्त्वाचं आहे.

Image Source: META

107 सेमी कंबर – आश्चर्यकारक निष्कर्ष!

ज्यांची कंबर सुमारे 107 सेमी होती त्यांचं आरोग्य तुलनेत थोडं स्थिर दिसून आलं. पण याचा अर्थ असा नाही की जास्त कंबर सुरक्षितच आहे.

Image Source: META

वजनावर नियंत्रण = मधुमेहावर ब्रेक!

आपलं वजन जर नियंत्रणात असेल, तर मधुमेहावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. कंबर मोजा, आरोग्य सांभाळा!

Image Source: META

कंबर कमी करायचीय? सुरुवात इथून करा!

सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिणं हा घरगुती उपाय खूप उपयोगी आहे. शरीर डिटॉक्स होतं आणि फॅटसुद्धा कमी होतो.

Image Source: META

मेथीचं पाणी – पिऊन बघा, फरक जाणवेल!

रात्री भिजवलेली मेथी सकाळी पिणं फायदेशीर आहे. कंबर कमी करायचीय तर हा उपाय नक्की वापरून बघा.

Image Source: META

व्यायाम म्हणजे तुमचं फिटनेस मंत्र!

क्रंचेस, प्लँक, साइड प्लँक – हे सगळे व्यायाम पोटाभोवतीचं फॅट कमी करतात. रोज 15-20 मिनिटे दिली तरी चांगले परिणाम दिसू लागतात.

Image Source: META

गोडावर नियंत्रण = साखर नियंत्रणात

गोड खाणं म्हणजे मधुमेहाला दार उघडून देणं. साखर कमी करा आणि आयुष्य साखरेसारखं गोड ठेवा – पण आरोग्यदायी!

Image Source: META