उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने पाणी प्या.
घट्ट आणि गडद रंगाचे कपडे टाळा. हलके रंगाचे आणि सुती कपडे उष्णता शोषून घेत नाहीत.
शक्य असल्यास सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा.
घराबाहेर पडताना आपल्या त्वचेला हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून वाचवण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन लावा.
उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे सनग्लासेसचा वापर करा.
तेलकट आणि मसालेदार पदार्थांऐवजी ताजी फळे, भाज्या आणि हलके अन्न घ्या.
दिवसातून दोन वेळा स्नान करा किंवा सारखे थंड पाण्याने डोक्यावर पाणी टाका.
ताजी फळे जसे की कलिंगड, खरबूज, संत्री यांचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.
लिंबू पाणी, नारळ पाणी आणि इतर नैसर्गिक सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ऊर्जा टिकून राहते.