काळवंडलेल्या काखेची लाज वाटते?
प्रामुख्याने महिलांना स्टायलिश कपडे घालायचे असतील, तर काळवंडलेल्या काखेमुळे अनेकांना चारचौघात हात वर करायला लाज वाटते.
काळवंडलेल्या काखेमुळे स्लीव्हलेस कपडे घाल्यण्याच्या इच्छेवर अनेकांना पाणी सोडावं लागतं.
काळवंडलेल्या काखेच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.
अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा, चिमूटभर हळद आणि थोडं पाणी मिसळा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावल्यास काळेपणा दूर होईल.
एक छोटा बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. दोन चमचे बटाट्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब टाका. हे मिश्रण काखेला लावून 10 मिनिटांनी धूवा.
एका वाटीत एक चमचा दही, लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन एकत्र करून चांगलं मिक्स करा. ही पेस्ट काखेला लावून 20 मिनिटांनी पाण्यानं धुवा. यामुळे काखेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.
एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घालून चांगली पेस्ट करा. ही पेस्ट डार्क अंडरआर्म्सवर लावा आणि 5 मिनिटांनी धुवून टाका. याचा फायदा होईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.