उन्हाळ्याप्रमाणेच थंडीच्या दिवसातही त्वचा टॅन होण्याची समस्या होते.
तुम्हीही टॅनिंगपासून त्रासलेले असाल, तर यापासून सुटका मिळवण्यासाठी एक सोपा घरगुती मार्ग आहे.
दोन चमचे मसूर डाळ, दोन चमचे तांदूळ, दोन चमचे साखर आणि गुलाबाच्या काही पाकळ्या हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्या.
आता हे मिश्रण एका वाटीमध्ये घ्या आणि यामध्ये दोन चमचे हळद मिसळा.
अंघोळ करताना या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दही मिसळून पेस्ट तयार करा.
हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावा. हात, पाय आणि मानेवर ही पेस्ट लावा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.