अनेक पोषक तत्वांनी युक्त एवोकॅडो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Image Source: istock

एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक असतात आणि अनेक समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते.

Image Source: istock

आहारात याचा समावेश केल्याने एकच नाही तर अनेक फायदे होतात.

Image Source: istock

मात्र, असे काही लोक आहेत ज्यांनी चुकूनही ते खाऊ नये, अन्यथा त्यांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. एवोकॅडो कोणासाठी हानिकारक आहे ते जाणून घ्या.

Image Source: istock

ब्लोटिंग

एवोकॅडोमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ज्या लोकांना ब्लोटिंग किंवा पचनासंबंधित समस्या आहेत त्यांनी हे खाणे टाळावे. कारण त्यामुळे पोट फुगणे, गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: istock

वजन वाढणे

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चुकूनही एवोकॅडो खाऊ नका. या पौष्टिक फळामध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.

Image Source: istock

ऍलर्जी

काही लोकांना एवोकॅडोची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्यांना खाज सुटणे, सूज येणे किंवा पुरळ उठणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणून, जर तुम्हाला ऍलर्जीक रिॲक्श असेल तर हे खाणे टाळा.

Image Source: istock

गर्भधारणेदरम्यान टाळा

सामान्यतः गर्भधारणेदरम्यान एवोकॅडो खाणे सुरक्षित असते, पण काही स्त्रियांना याच्या सेवनामुळे पचन समस्या किंवा छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Image Source: istock

मायग्रेन

ज्यांना मायग्रेनची समस्या आहे त्यांनी एवोकॅडोपासून शक्य तितके दूर राहावे. याचे सेवन मायग्रेनसाठी ट्रिगर ठरु शकते, ज्यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या यासारख्या समस्या होऊ शकतात.

Image Source: istock

ऍसिड रिफ्लक्स

एवोकॅडोमध्ये जास्त प्रमाणात चरबी असते, ज्यामुळे काही लोकांमध्ये छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात, ज्यामुळे पचनासंबंधित समस्या आणि अस्वस्थता वाटते.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock