आल्याचा चहा जास्त प्यायल्याने पोटात जळजळ आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.
गर्भवती महिलांनी आल्याचा चहा मर्यादित प्रमाणात प्यावा.
आले हे नैसर्गिकरित्या गरम आहे, त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो.
आल्याचा स्वभाव उष्ण आहे, त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो, त्यामुळे याचे सेवन जास्त करु नये.
आल्याचा चहा रक्तदाबावर परिणाम करू शकतो. उच्च रक्तदाब असलेल्यांनी सावधगिरीने आल्याचे सेवन करावे.
आल्याचा चहा रक्तस्त्राव वाढवू शकतो. त्यामुळे नाकातून रक्त येणे यासारखे रक्तस्त्राव विकार असलेल्या लोकांनी हा चहा टाळावा.
आल्याच्या चहाच्या अतिसेवनामुळे तोंडात फोड येणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास हा त्रास होतो.
आल्याच्या चहाचे सेवन माफक प्रमाणात केल्यास त्याचा शरीराला फायदा होईल. जास्त चहा पिणे टाळा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.