पोट अन् मांड्यावरील चरबी मेणासारखी वितळेल, 'हे' करुन पाहा

Image Source: istock

रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.

Image Source: istock

कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिण्याचे फायदे

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. हे मिश्रण वजन नियंत्रणात मदत करते.

Image Source: istock

वजन कमी करण्यास उपयुक्त

लिंबूमध्ये पेक्टिन फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट भरले राहिल्याने भूक कमी लागते. त्यामुळे तुम्हाला जास्त खाणं टाळता येतं. हे पाणी पिल्याने भूक कमी होते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Image Source: istock

पचनास मदत करते

कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लिंबाचा रस आम्लीय आहे. ज्यामुळे गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन वाढते, यामुळे अन्न पचवण्यास मदत होते.

Image Source: istock

पचनाशी संबंधित समस्या दूर

हे पाणी प्यायल्याने पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

Image Source: istock

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, विशेषत: व्हिटॅमिन सी त्वचेला निरोगी बनवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह अकाली वृद्धत्व आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यात फायदेशीर आहे.

Image Source: istock

त्वचा निरोगी ठेवते

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सी त्वचेचा कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.

Image Source: istock

प्रतिकारशक्ती वाढते

हिवाळ्यात, कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, अनेक रोग आणि संक्रमण लोक बळी पडतात. यादरम्यान, गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Image Source: istock

श्वसन संक्रमणापासून सुटका

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच, लिंबातूल व्हिटॅमिन सी श्वसन संक्रमणापासून सुटका मिळवण्यात मदत करते.

Image Source: istock


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.