मेथी आणि आल्याचं पाणी यापैकी कोणता उपाय वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे हे जाणून घ्या.
मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. हे पचन क्रिया सुधारून चरबी घटवण्यास मदत करते.
रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गलाऊन घ्या आणि रिकाम्या पोटी याचं सेवन करा.
मेथीच्या पाणी वजन कमी करण्यात उपयुक्त आहे.
आलं हे एक नैसर्गिक टॉनिक आहे, जे वजन कमी करण्यात फायदेशीर आहे.
आल्याचे छोटे छोटे तुकडे करून ते पाण्यात टाकून उकळा. हे पाणी गाळून सकाळी अनोशेपोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
या पैकी आलं मेटाबॉलीजम बूस्ट करण्यास मदत करते. तर मेथी दाणे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
मेथी आणि आलं, हे दोन्ही नैसर्गिक फॅट बर्नर आहेत.
थंडीच्या मोसमात वजन कमी करण्यासाठी आल्याचं पाणी अधिक प्रभावी आहे.
मात्र, जर तुम्हाला पचनक्रिया सुधारायची असेल तर मेथी दाण्याच्या पाण्याचं सेवन करा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.