कॉफी शरीरासाठी लाभदायक की हानीकारक?

वाचा आणि तुम्हीच ठरवा

कॉफी कशी बनते?

अरेबिका नावाच्या झाडाच्या फळापासून कॉफी तयार केली जाते. या झाडावर उगवणाऱ्या बीन्स म्हणजेच कॉफी बीन्स भाजून आणि त्याची बारीक पावडर करून कॉफी बनवली जाते.

कॉफी पिण्याचे फायदे

कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

एनर्जी बूस्टर

कॉफी ऊर्जा आणि चपळता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदू आणि मज्जासंस्थेची क्रियाशीलता वाढवते.

टाइप 2 मधुमेहासाठी फायदेशीर
दररोज 4 कप कॉफी प्यायल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो, असं मधुमेहावरील संशोधनात समोर आलं आहे.


वजन कमी करण्यासाठी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन चयापचय क्रिया वाढवते. चयापचय म्हणजेच अन्नातून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया. चयापचय क्रियेतून निर्माण होणारी उष्णता वजन कमी करुन लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

यकृतासाठी उपयुक्त

संशोधनानुसार, मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन यकृत सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

नैराश्य दूर करते

कॉफीच्या सेवनाने अल्फा-अमायलेज नावाचे एन्झाइम वाढते. यामुळे नैराश्य, तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते.

अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाला प्रतिबंध

कॉफी अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांपासून देखील संरक्षण करते.

हाय ब्लडप्रेशरसाठी फायदेशीर

कॉफी उच्च रक्तदाब पातळी कमी करण्यास देखील मदत करते.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.