प्रोटीन का महत्त्वाचं आहे?

प्रोटीन हे शरीराच्या स्नायू, त्वचा आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.शाकाहारी लोकांसाठी योग्य प्रोटीन स्रोत निवडणं महत्त्वाचं आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

मूग डाळ (Green Gram)

मुग डाळीमध्ये 100 ग्रॅममध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रोटीन असतं हातसडीच्या मूगडाळीपासून खिचडी, डाळ किंवा सूप तयार करता येतं.

Image Source: pinterest

राजमा (Kidney Beans)

राजमामध्ये फायबर्ससह प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं – सुमारे 22 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम संध्याकाळचं जेवण किंवा ब्रेकफास्टमध्ये उत्तम.

Image Source: pinterest

चवळी (Black-eyed peas)

100 ग्रॅममध्ये ८ ग्रॅम प्रोटीन.शिजवलेली चवळी पचायला हलकी व प्रोटीनयुक्त आहे.

Image Source: pinterest

शेंगदाणे (Peanuts)

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनसह हेल्दी फॅट्स असतात 100 ग्रॅममध्ये जवळपास २५ ग्रॅम प्रोटीन

Image Source: pinterest

सफरचंदाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया (Seeds)

सूर्यफूल, फ्लॅक्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रोटीन आणि ओमेगा फॅट्स असतात.एका चमच्यात सुमारे 5-7 ग्रॅम प्रोटीन.

Image Source: pinterest

पनीर (Paneer)

100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असतं.नाश्त्यासाठी किंवा जेवणात समाविष्ट करा.

Image Source: pinterest

दूध आणि दुधाचे पदार्थ (Milk & Curd)

दुधात प्रोटीन, कॅल्शियम आणि विटॅमिन B12 असतं.एका ग्लास दूधात 8 ग्रॅम प्रोटीन

Image Source: pinterest

सोया (Soy Products)

सोयाबीन किंवा टोफूमध्ये अत्यंत उच्च प्रमाणात प्रोटीन – 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅम.शाकाहारींसाठी सर्वश्रेष्ठ पर्याय

Image Source: pinterest

नियमित आहारात प्रोटीनचा समावेश कराप्रत्येक जेवणात थोडं थोडं प्रोटीन असणं आवश्यक.शाकाहारींसाठीही पर्याय भरपूर आहेत – फक्त योग्य नियोजन करा!

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest